राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांचा सवाल
*⚡सावंतवाडी ता.२९-:* सावंतवाडी शहरात बोअरिंग करून केबल न घालता रस्ते उखडून केबल टाकण्याचा जो खटाटोप केला याचा नाहक त्रास व्यापारी व नागरिक यांना होत आहे, त्यामुळे हा खटाटोप नेमका कोणासाठी केला, असा सवाल राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांनी केला आहे. टेमकर म्हणाले, शहरात बाजार पेठेतील एसी कार्पेटचे रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम जोरात सुरु आहे. याचा त्रास व्यापारी, नागरिकांना सहन करावा लागत असून वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात होणाऱ्या विकासकामाला आमचा विरोध नाही. नगरसेवक हे उत्पन्नाचे साधन नाही असं केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी संबोधित केले. या वाक्याचा बोध नगरसेविकांनी घेऊन तो अंमलात आणावा असा खोचक टोला देवेंद्र टेंमकर यांनी लगावला. तर दिवाळी, नाताळ सारखे मोठे सण जवळत येत असल्यानं खोदलेले रस्ते तात्काळ वाहतूकीसाठी सुस्थितीत आणावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी नगरपरिषद प्रशासनाकडे करणार आहे असेही टेमकर यांनी सांगितले.