सत्तेत असताना पदाधिकारी विज कनेक्शन कट करू नका असे सांगत करत आहेत जनतेची दिशाभूल…

शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा टोला…

*⚡सावंतवाडी ता.२९-:* दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्यात येत असल्याबाबत आज वीज वितरणला भाजप पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी वीज कापू नका अशी निवेदन महावितरणला देत लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत. यांच्याच मंत्र्यांनी वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या मंत्र्यांना वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश रद्द करण्यास सांगावे, असे मत शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी व्यक्त केले. दरम्यान, वसुली न झाल्यास आज प्रशासन महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहे. सत्तेत असताना अशी स्टंटबाजी घटक पक्षाचे पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे जनतेन दिशाभूल करणाऱ्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी थकीत बील पाठवावी अस आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केल. तर नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर यांनी वीज कट न करण्याच आवाहन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विर्नोडकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, अजय सावंत, अमित परब, दीपक सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page