आगारप्रमुख वैभव पडोळे : प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन
*⚡सावंतवाडी ता.२९-:* दिवाळीनिमित्त १, २ व ३ नोव्हेंबर रोजी पुणे ते सावंतवाडी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. सकाळी ८.१५ वाजता पुणे निगडी – सावंतवाडी. (परिवर्तन बस) आंबोलीमार्गे, रात्री ८ वाजता पुणे निगडी – सावंतवाडी – पणजी. (परिवर्तन बस) राधानगरी – फोंडा – कणकवलीमार्गे, पुणे निगडी – रात्री ८ वाजता सावंतवाडी – पणजीमार्गे :- आंबोली, सकाळी ४ वाजता पुणे स्टेशन – सावंतवाडी. (परिवर्तन बस) उत्तुर आंबोलीमार्गे, सकाळी ६.३० वाजता पुणे निगडी – सावंतवाडी उत्तूरमार्गे, रात्री ८.३० वाजता पुणे निगडी – सावंतवाडी (शिवशाहीं वातानुकूलित) मार्गे :- गडहिंग्लजमार्गे।आंबोली अशा बस सोडण्यात आल्या आहेत.