मळगाव येथील प्रकार:राजकीय वातावरण तापले
सावंतवाडी : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला मळगाव बायपासवरील राष्ट्रवादीचा बॅनर अज्ञाताने फाडल्याने राजकीय वातावरण सावंतवाडीत तापला आहे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून जिल्ह्यात जोरदार स्वागताची तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी झेंडे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र मळगाव बायपासवरील राष्ट्रवादीचा बॅनर अज्ञाताने फाडल्याने राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.