सिंधुदुर्गातील समुद्र किनारी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करा…

युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोस्कार यांची खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी…

सावंतवाडी-: समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना होताना दिसत आहे. अश्या दुर्घटना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर सारख्या मोठ्या वर्दळीच्या समुद्र किनारी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी सिंधुदुर्ग युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांनी खासदार श्री विनायक राऊत यांचे निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. यावेळी माजी आमदार श्री शंकर भाई कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय पडते, युवासेना जिल्हाधिकारी श्री मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री सुनील दुबळे, शिवसेना तालुकाप्रमुख श्री यशवंत परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री सचिन देसाई आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page