थकीत वीज बिल शक्य तेवढे भरा

दिवाळी असल्याने एवढ्यात वीज जोडणी तोडणार नाही;वीज वितरण अधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना आश्वासन

*⚡सावंतवाडी ता.२७-:* दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सावंतवाडी तालुक्यात महावितरण कडून थकित बिल ग्राहकांची विज कनेक्शन तोडण्यात येत असून, याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिकारी श्री. भुरे यांची भेट घेत विचारणा केली होती. यावेळी श्री. भुरे यांनी यापुढे एकही नागरिकांचे विज कनेक्शन तोडण्यात येणार नाही. परंतु, नागरिकांनी थकित वीज बिल शक्य होईल तेवढे – तेवढे भरावे आणि महावितरणला सहकार्य करावे अशी मागणी भुरे यांनी पुंडलिक दळवी यांच्याकडे केली. त्यानंतर तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी नागरिकांनी थकित वीज बिल भरून महावितरण ला सहकार्य करण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, आगोस्तीन फर्नांडिस, अफरोज राजगुरू, असलम खतिब, अर्षद बेग, आसिफ ख्वाजा, किशोर परब, संजय पालव, जाफर खानापुरी, इन्सुली, बांदा येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page