सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.२२-:* नाताळ सणासाठी गोव्यात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दोन जादा बस सुरू करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाकडून घेण्यात आला आहे. २४ डिसेंबर रोजी बोरिवली ते पणजी अशी साधी एस्टी बस व्हाया ठाणे पनवेल मार्गे संध्याकाळी ५ वाजता सुरू करण्यात आली आहे. तर पुणे ते पणजी अशी शिवशाही बस व्हाया कोल्हापूर गडिंग्लज मार्गे रात्री ८ वाजता सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली आहे. तसेच या दोन्ही गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यानी केले आहे.
