तालुक्यातील ठरली पहली ग्रामपंचायत
*⚡दोडामार्ग ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांच्या प्रयत्नाने आज पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्यातील खोक्रल गावात कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १८+ वर्षावरील सर्व लोकांचे १००% लसीकरण करून घेतल्यानंतर खोक्रल गावात पाचही लसीकरण सत्र १००% यशस्वी झाली आहेत. खोक्रल गावाने ४५ व १८ वर्षावरील लोकांच्या लसीकरणात अग्रणी सहभाग दर्शविला असून, तसेच अनेक ग्रामस्थांना घरी जाऊन लस देण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशीचे आरोग्य कर्मचारी, सरपंच देवेंद्र शेटकर ग्रामपंचायत खोक्रल यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच उपसरपंच श्री गोपाळ गवस, सदस्य विनायक गवस, अंजु गवस, सविता गवस, हेमा गवस, तंटा मुक्ती अध्यक्ष श्री दीपक गवस, अमित गवस, साईनाथ गवस , नवनाथ सलोस्कर, अजय गवस, विक्रम जाधव, अजित गवस, व पोलीस पाटील विलास शेटकर आशासेविका सौ वैष्णवी शेटकर , मंगळा गावडे , सौ. काजल गवस, अरोग्या सेविका सौ. गुंता गवळी, श्री अमोल गवस, सौ. रेडकर सिस्टर, धरणे सिस्टर, श्री विष्णू लक्ष्मण गवस यांच्या मोलाचा सहकार्य लाभले. गावातील सर्व ग्रामस्थ यांचे कार्य उल्लेखनीय आहे. खोक्रल गावातील लोकांनी लसीकरणाबद्द्ल दाखविलेली जागरुकता तालुक्यातील प्रत्येकाने दाखविल्यास कोविड १९ साथरोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे. असे मत सरपंच श्री. देवेंद्र शेटकर यांनी व्यक्त केले आहेत.
