*⚡वेंगुर्ला ता.२५-:* दाभोली तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच एकनाथ राऊळ यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. गेली ३ वर्षे दाभोली गावची तंटामुक्त समिती गठीत केली नव्हती. त्यामुळे यावर्षी ही समिती गठीत करुन श्री.राऊळ यांची निवड करण्यात आली. यावेळी दाभोली सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माजी सरपंच गुरुनाथ कांबळी, सदस्य विष्णू दाभोलकर, गार्गी राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर यांच्यासह ग्रामसेवक व अन्य उपस्थित होते.
दाभोली तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी एकनाथ राऊळ
