भाजप शहर उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांची विशाल सावंत यांच्यावर टीका
*⚡सावंतवाडी ता.२४-:* युवासेना शहर अधिकारी यांनी पहिल्यांदा आपला व्यवसाय सोडून, सामाजिक कार्य करावे. ज्यांचा व्यवसायच कमिशनवर आधारित आहे. त्यांना कमिशनचीच स्वप्न पडतात अशी टीका भाजप शहर उपाध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी युवासेना अधिकारी विशाल सावंत यांच्यावर केली आहे. सावंतवाडीतील सर्व प्रकल्प गेली १५ वर्ष बंद अवस्थेत धूळ खात पडले आहेत. हाच जनतेचा पैसा योग्य ठिकाणी वापरला असता तर हे प्रकल्प बंद अवस्थेत पडले नसते. असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यापूर्वी ज्या ज्यावेळी शहरात खुदाई झाली. त्यावेळी आपल्या नगराध्यक्षानी किती कमिशन घेतले ते जाहीर करावे असे आवाहन श्री. बांदेकर यांनी श्री. सावंत यांना दिले आहे.
