राष्ट्रीयकृत बँकांच्यावतीने कणकवली येथे 26 ऑक्टोबर रोजी ऋण संपर्क अभियान

*⚡कणकवली ता.२४-:* स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सव तसेच आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत, भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशांनुसार विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने ऋण संपर्क अभियानाचे आयोजन मंगळवार 26 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.00 या कालावधित “मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई – गोवा हाईवे, कणकवली ” येथे करण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमात विविध राष्ट्रीयकृत बँकांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. संबंधित बँकांचे प्रतिनिधी मार्फत या कार्यक्रमासाठी येणारया केंद्र व राज्य सरकार च्या लघु व सूक्ष्म, व्यावसायिक, शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या केंद्र व राज्य सरकार तसेच बँकांच्या विविध योजनांची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जे ग्राहक बँका पर्यंत पोहचु शकत नाहीत त्यांना आर्थिक सहाय्यता, किसान क्रेडिट कार्ड, स्वयं सहायता समूह, पीएम स्वनिधी, सीएमईजीपी ,स्टैंड अप इंडिया, पशुपालन, मत्स्यपालन इ. योजनांची माहीती त्यांना एकत्रित व एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने ऋण संपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने तसेच कणकवलीतील सर्व बँकाच्या सहभागाने होणारया या कार्यक्रमाचे उदघाटन कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितित करण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बड़ोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया ,यूनियन बँक ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी सर्व ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ऋण संपर्क अभियानामध्ये कोविड १९ शी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक प्रदीपकुमार प्रामाणिक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page