कणकवली येथे २५ डिसेंबरपासून नाथ पै एकांकिका स्पर्धा रंगणार

*⚡कणकवली ता.२१-:* दरवर्षी २४ डिसेंबर रोजी होणारी नाथ पै एकांकिका स्पर्धा यावर्षीही संस्थेने जाहीर केली आहे .एकांकिका स्पर्धा कणकवली येथे २५ डिसेंबर ते २ ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली जाईल . स्पर्धेची प्रवेश फी दोन्ही गटासाठी ५०० रुपये एवढी असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे . कोरोना काळातील सरकारचे नियम अमलात आणत ही स्पर्धा घेतली जाईल . गतवर्षी संस्थेने नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती . त्या स्पर्धेतील शालेय गटातील ४ व खुल्या गटातील ६ पारितोषिक विजेत्या एकांकिका व प्रथितयश लेखकांच्या शालेय गटातील ३ व खुल्या गटातील १७ एकांकिकांमधील एकांकिका सादर करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल . या व्यतिरिक्त अन्य एकांकिकांही सादर करता येतील . या स्पर्धेत शालेय गटात कमाल १० एकांकिका तर खुल्या गटात कमाल १५ एकांकिकांना प्रवेश देण्यात येईल . या स्पर्धेत खुल्या गटासाठी अनुक्रमे १५,००० रुपये ,१०,००० व ७,००० तर शालेय गटासाठी ५००० , ३००० व २००० रुपये अशी सांधिक रोख पारितोषिके , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते तर अभिनय स्त्री – पुरुष , दिग्दर्शन , नेपथ्य यासाठीही रोख पारितोषिके , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वतंत्रपणे देण्यात येतील . स्पर्धेत एकूण ६० हजार रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत . अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह शरद सावंत यांच्या ९ ४२२५८४०५४ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड . एन . आर . देसाई यांनी केले आहे .

You cannot copy content of this page