जुन्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनातून बूथ कमिटया

तालुका पक्ष निरीक्षक इर्शाद शेख;तालुका काँग्रेसची वायरीत बैठलं संपन्न

*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुका काँग्रेसची कमिटीची मासिक सभा वायरी येथे मालवण तालुका निरीक्षक इर्षाद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी गेल्या ६५ वर्षातील काँग्रेस पक्षाचे काम तरुण कार्यकर्त्याना समजावून सांगत इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन केले. येत्या दिवाळीच्या दरम्यान ग्रामीण भागातील जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ कमिट्या बनवाव्यात अशी सूचना इर्शाद शेख यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली. या सभेस काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, निरीक्षक इर्शाद शेख, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, आप्पा चव्हाण, सतीश कदम, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, समीर वंजारी, हेमंत कांदळकर, लक्ष्मीकांत परुळेकर, हेमंत माळकर, मधुकर लुडबे, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, युवक तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, युवक शहराध्यक्ष गणेश पाडगावकर, बाबा मेंडिस, श्रेयस माणगांवकर, ममता तळगावकर, हर्षदा पाटील, संगीता शिरवडेकर, प्रणित बिलये, मिनीन फर्नांडिस आदी व इतर उपस्थित होते. गावागावात बूथ कमिटी बनविण्यासाठी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांनी सूचना करून तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांच्यासह आप्पा चव्हाण, अरविंद मोंडकर, महेंद्र मांजरेकर, संदेश कोयंडे, सतीश कदम, जेम्स फर्नांडिस यांची समन्वय समिती यावेळी गठीत करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना भेटी देऊन तालुका संघटना सक्षम करणार, असे सांगितले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी महिलांना छोटे व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक ताकद देण्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिलाध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे यांचा मेळावा मालवणमध्ये आयोजित करू, असे सांगितले. ग्रामीण भागातील युवकांना देखील पक्षात घेऊन त्यांना व्यवसायायिक मार्गदर्शन देऊन रोजगार निर्मितीचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी सांगितले. नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र येऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा चव्हाण यांनी सांगितले. तर येत्या मालवण नगरपरिषद निवडणूक मध्ये ५० टक्के तरुणांना संधी द्या, आम्ही अर्ध्या अधिक जागा निवडून आणणारच, असा दावा यावेळी युवक शहराध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी केला. सभेचे सूत्रसंचालन महेंद्र मांजरेकर तर आभार अरविंद मोंडकर यांनी मानले.

You cannot copy content of this page