*⚡कुडाळ ता.१७-:* विजयादशमीचे औचित्य साधून रेडी येथील यशवंत गडावर शिवप्रेमींनी ” आधी तोरण गडाला, मग माझ्या घराला” या उपक्रमांतर्गत यशवंत गडावर दीपोत्सव आणि विजयोदुर्गोत्सव शिवप्रेमी कडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विजयादशमीच्या आदल्या दिवशी दीपोत्सव साजरा करत संपूर्ण गड दिवा आणि मशालीनी उजळून निघाला होता. तसेच विजयादशमी दिवशी यशवंत गडाच्या प्रवेश दारावर फुलांचे तोरण बांधत संपूर्ण गड फुलांनी सजवला होता. आज आपणाला दिसणारे सारे वैभव हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाने आणि मावळ्यांच्या सांडलेल्या रक्ताच्या जोरावर उभे राहिले आहे. त्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण रहावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला होता. यावेळी शिवप्रेमी कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यशवंत गड रेडी येथे दीपोत्सव आणि विजयोदुगोत्सव शिवप्रेमी कडून साजरा…
