माहिती समिती अध्यक्ष अशोक दळवी यांची माहिती
सावंतवाडी-:संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत १०५ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली. दरम्यान कोरोनामुळे मृत पावलेल्या नातेवाईकांच्या सात प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले. याबाबत तालुका समितीची सभा श्री.दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी समितीचे सचिव तथा तहसिलदार राजाराम म्हात्रे, नायब तहसिलदार, मनोज मुसळे, समितीचे सदस्य गजानन नाटेकर, नारायण राणे, सौ. भारती मोरे, संजय देसाई, अनिल जाधव, सावंतवाडी पंचायत समिती सहायक अधिकारी विनायक पिंगुळकर, संजय गांधी योजना कार्यालय अव्वल कारकुन डी.व्ही. मेस्त्री आदी उपस्थित होते . यावेळी महापुरामध्ये नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्याबद्दल तहसीलदार श्री.म्हात्रे यांचा उपस्थितांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.