सावंतवाडी शहरातील नवदुर्गांचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

विसर्जनस्थळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त

*⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी शहरातील नवदुर्गांचे भक्तीमय वातावरणात ढोल ताशाच्या गजरात काल रात्री उशिर विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंडळाच्या मोजक्याच पदाधिकाऱ्यांना विसर्जन ठिकाणी सोडण्यात येत होते. शहरात बाजारपेठ मित्र मंडळ, ओंकार कला क्रीडा मंडळ, माठेवाडा मित्र मंडळ, रासाई मित्र मंडळ जिमखाना या ठिकाणी नवदुर्गाचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर नऊ दिवस त्या ठिकाणी विविध संस्कृत कार्यक्रम घेण्यात आले तर ओंकार कला क्रीडा मंडळ भटवाडी यांच्याकडून कोरोना काळात शिक्षणापासून तसेच स्पर्धा परीक्षांपासून दुरावलेल्या मुलांच्या कलेला वाव मिळावी यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात आले होते यात मुलांनी उस्फुर्त प्रतिशत देत रंगत आणल. तर शहरातील इतर मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम भजन, गर्भा नृत्य तसेच विविध कार्यक्रम करत नऊ दिवस आनंदात साजरे करण्यात आले गेल्या वर्षी सर्वच आनंद हिरावून घेतलेल्या कोरोनाला विसर घालत या वर्षी दिमाखात हे नऊ दिवस उत्सवात साजरे करण्यात आले तर शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून मंडळाकडून कार्यक्रम करण्यात आले काल रोजी सायंकाळी उशिरा सालाबाद प्रमाणे ठरलेल्या मार्गावर ढोल ताशाच्या गजरात मिरवळून काढण्यात आली तर रात्री उशिरा येथील श्री राम वाचन मंदिर समोरील विसर्जन कट्ट्यावर दुर्गामातेचे आरती तसेच इतर विधी करून विसर्जन करण्यात आले यावेळी विसर्जन स्थळी नागरिकांची एकाच गर्दी झाली होती या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

You cannot copy content of this page