परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी भाविक नतमस्तक… !

सायंकाळी मंदिर परिसरातच पालखी प्रदक्षिणा ; दैनंदिन आरतीने या उत्सवाची होणार सांगता…!

*💫कणकवली दि.२१-:* असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी दिनाचा आज मुख्य दिवस असल्याने पहाटे नित्यपूजेने बाबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कोरोनाच्या काळात हि अबालवृद्धा सोबतच तरुणांनी सकाळी पहाटे काकड आरती पासूनच हजेरी लावली.भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष करत सायंकाळी मंदिर परिसरातच पालखी प्रदक्षिणा पार पडणार असून रात्रीच्या नित्यआरतीने या उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवास भक्तांनी हि कोरोना संसर्ग वाढू नये यादृष्टीने मास्क,शारीरिक अंतर पाळत उत्सवात सहभाग घेतला. परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी उत्सव गेले चार दिवस धार्मिक व भक्तीमय वातावरणात भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडत आहे. आजच्या शेवटच्या म्हणजेच पुण्यतिथी उत्सवास हि भाविक भक्तांनी हजेरी लावत बाबांच्या चरणी नतमस्तक झाले.सोमवारी मुख्य दिवशी बाबांच्या समाधीस्थानी नेत्रदीप अशी फुले,विद्युत रोषणाईनी सजावट करण्यात आली आहे. तसेच समाधीस्थानी राजोपचार महापूजा करत अभिषेख करण्यात आला.दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांनी याची देही याची डोळा ‘ बाबांची मूर्ती आणि समाधी स्थानी सुरु असेलेल्या अभिषेखाचा सोहळा आपल्या डोळ्यासोबतच मोबाईल मध्ये साठवला. तद्नंतर भालचंद्र महाराज समाधीस्थानी किरणोत्सव व मंदिरपरिसरात देवतांचे दर्शन घेतले.गाऱ्हाणे व दुपारची आरती,दर्शन सोहळा,सायंकाळी सुश्राव्य भजने शहरातील भजनी बुवांनी करत आराधना केली.सायंकाळी भालचंद्र संस्थान ते हनुमान मंदिर असा पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून यामध्ये हि भक्तांनी कोरोना बाबतचे नियम पाळने आवश्यक आहे. असे आवाहन संस्थांच्यावतीने अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.तर धूप आरती व दैनंदिन आरतीने या उत्सवाची सांगता होणार आहे.

You cannot copy content of this page