सिंधुदुर्गनगरी ता २१ सुकळवाड येथील श्री ब्राह्मण देवाच्या १ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या जत्रोत्सवा निमित्त २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध गटातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने श्री ब्राह्मणदेवाच्या जत्रोत्सवा निमित्त २३ डिसेंबर पासून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ व २४ डिसेंबर रोजी सुकळवाड करंडक (गाव मर्यादित) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक ५००१ रुपये, द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये व इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत एक ग्रामपंचायत गटातील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक ७००१ रुपये व द्वितीय पारितोषिक ५००१ रुपये व इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. २८ डिसेंबर रोजी १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम पारितोषिक ११११ रुपये ,द्वितीय पारितोषिक ७७७ रुपये व इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१००१ रुपये, द्वितीय पारितोषिक ११००१ रुपये ठेवण्यात आले आहे. श्री ब्राम्हणदेव क्रीडा मंडळ आयोजित या विविध गटातील सर्व क्रिकेट स्पर्धांसाठी रोख पारितोषिका बरोबरच आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट गोलंदाज ,उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर यांच्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री ब्राह्मण देवाच्या जत्रोत्सवा दिवशी १ जानेवारी २०२१ रोजी रात्री १० वाजता करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील भाविकांनी व क्रीडा रसिकांनी जत्रोत्सव व क्रीडा स्पर्धांचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री ब्राम्हणदेव क्रीडा मंडळ आणि श्री ब्राम्हणदेव सेवा समितीने केले आहे.
श्री ब्राम्हण देव जत्रोत्सवानिमित्त विविध गटातील टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन
