नगरपालिकेस सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन*
*💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी नगरपालिकेतर्फे डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत असून, नगरपालिकेने सावंतवाडी वासियांना प्रसिध्दी पत्रकाद्वारे सुचित केले आहे की, गळती असलेले सेप्टिक टँक हे डास उत्पत्तीचे स्थान असून असे गळती असणारे सेप्टिक टँक त्वरित दुरुस्त करून डासांपासून होणारे मलेरिया, डेंग्यू, इत्यादी सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
