मळगाव येथे दसरोत्सव उत्साहात साजरा

*शिवलग्न सोहळा मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या साक्षीने पडला पार*

*⚡सावंतवाडी ता.१६-:* तालुक्यातील मळगाव येथे पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत दसरोत्सव सण उत्साहात साजरा झाला. यावेळी खास आकर्षण असलेला शिवलग्न सोहळा मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या साक्षीने पार. पडला. मळगावातील ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शविली. ज़िल्ह्यात ठीकठिकाणी शुक्रवारी दसरोत्सव विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. मळगाव येथील श्री देव रवळनाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. यनिमित्त श्री देव रवळनाथ देवाला विविध वस्त्रालंकरांनी सजविण्यात आले होते. भाविकांनी केळी, नारळ, देऊन देवाचे दर्शन घेतले. सायंकाळी ४ वाजता शिवलग्न सोहळा पार पडला. त्यानंतर तरंगकाठी व देवीच्या पालखीसाह ढोलांच्या गजरात सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. सोने लुटल्यानंतर भविकांनी देवाला सोने अर्पण करून आशीर्वाद घेतला. सामूहिक गाऱ्हाणे झाल्यावर दसरोत्सव सोहळ्याची सांगता झाली.

You cannot copy content of this page