खारेपाटण पंचशील नगर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा

*⚡कणकवली ता.१६-:* पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या सयूंक्त विद्यमाने पंचशील नगर,खारेपाटण येथे ६५ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांनी सम्पन्न झाला. या कार्यक्रमाला खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत, ग्रा.प.सदस्य योगेश पाटणकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष मोहन पगारे, सचिव मंगेश कांबळे, जितेंद्र कदम, युनिक अकॅडमी कणकवली ब्रँचचे संचालक सचिन कोर्लेकर,संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्षा सौ.आकांक्षा पाटणकर,युवा कार्यकर्ते ऋषी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण पंचशील नगर येथील धम्म संस्कार केंद्र येथे भ.बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सामुदायिक बौद्ध धम्म पूजा पाठ घेण्यात आला. यावेळी बौद्धजन सेवा संघ खारेपाटण विभागाचे बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर यांनी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्व बौद्ध बांधवांकडून २२ प्रतिज्ञा म्हणून घेतल्या. तर खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, बौद्धजन सेवा संघ खारेपाटण चे अध्यक्ष मोहन पगारे, सचिव मंगेश कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्थानिक मंडळाच्या वतीने अध्यक्ष संतोष पाटणकर ,महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.आकांक्षा पाटणकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. “भ. गौत्तम बुद्धांच्या नंतर सम्राट अशोक राजाने या देशात क्रांती केली. त्यांनतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील क्रांती नंतर प्रतिक्रांती करावी लागली.बौद्ध धर्माचे मूळ भारत देश आहे.परन्तु बौद्ध धर्म टिकविण्यासाठी प्रत्येकवेळी क्रांती करावी लागली आहे.त्यामुळे प्रत्येक बौद्ध बांधवांनी धम्मा प्रति जागरूक असणे गरजेचे आहे.” असे भावपूर्ण उदगार सामाजिक कार्यकर्ते सचिन कोर्लेकर यांनी खारेपाटण येथे कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले. यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,मोहन पगारे,मंगेश कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मुलांचे विविध फनिगेम्स घेण्यात आले. तर सायंकाळी मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थित “धम्म काल आज आणि उद्या ” या विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले.यामध्ये पंचशील नगर खारेपाटण येथील युवक युवती यांनी सहभाग घेतला होता. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटणकर,धीरज जुमलेकर,प्रथमेश कदम,सिद्धेश पाटणकर,संतोष जुवाटकर,भरत पाटणकर,हर्षल कदम,राहुल पाटणकर यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळाचे चिटणीस योगेश पाटणकर यांनी केले.

You cannot copy content of this page