*⚡बांदा ता.१४-:* १४ ऑक्टोबर हा जागतिक हात धुणे दिन म्हणून साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने बांदा जि. प. केंद्रशाळेत हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, सावंतवाडी सभापती निकिता सावंत, उपसभापती शितल राऊळ, सरपंच अक्रम खान, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, सावंतवाडी बीडीओ रविंद्र कणसे, व्ही. एम. नाईक, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षा संजना सावंत यांनी बांदा केंद्रशाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर, किशोरी बांदेकर, रिया अल्मेडा, समिक्षा सावंत, मुख्याध्यापिका सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, शाम सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक ठाकूर, सुत्रसंचलन जे. डी. पाटील यांनी केले.
बांदा केंद्रशाळेत जागतिक हात धुणे दिन साजरा
