महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी

अन्यथा मनसे स्टाइलने उत्तर दिले जाईल;मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांचा इशारा

* सावंतवाडी : येथील कृषी कार्यालयातील महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्यावर योग्य ती कडक कारवाई केली जावी अन्यथा त्या अधिकाऱ्याला तालुक्यात थारा देणार नाही. यापुढे सावंतवाडी तालुक्यात महिलांच्या बाबतीत असे होणारे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत त्यांना मनसे स्टाइलने उत्तर दिले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसूळे यांना मनसेच्या वतीने गुरुवारी निवेदन देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांची याप्रकरणी चौकशी सुरू असून तो अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी कृषी अधिकारी अडसूळे यांनी दिले. आज मनसेच्यावतीने येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेना परिवहन जिल्हाध्यक्ष अॅड. राजू कासकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवकर, लक्ष्मीकांत हरमलकर, मंगेश वरक आदी उपस्थित होते. यावेळी सुभेदार यांनी कृषी विभागात कार्यरत असलेले कृषी पर्यर्वेक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील कृषी सहाय्यक महिलांच्या बाबतीत असभ्य वर्तन केले जात आहे. यापूर्वी तो अधिकारी कणकवली, कुडाळ कृषी कार्यालयात कार्यरत असताना त्याने असेच प्रताप केले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती आता सावंतवाडीत झाली असून अशा लंपट अधिकाऱ्यांना यापूढे सावंतवाडी तालुक्यात थारा देणार नाही. त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जावी, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा दिला. यावेळी अॅड. राजू कासकर यांनी तो वादग्रस्त अधिकारी यापुढे तालुक्यात येता कामा नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्या अधिकाऱ्याच्या अगोदरच्या घटना पहिल्या असता अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे सांगितले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करून दोषी आढळल्यास कारवाई केलीब जाईल, असे आश्वासन अडसूळे यांनी दिले.

You cannot copy content of this page