सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड
*⚡सावंतवाडी ता.१३-:* किनळे गावच्या ग्रामसभेमध्ये किनळे गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी गंगाराम होडावडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सलग तिसऱ्यांदा होडावडेकर यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत बोलताना होडावडेकर यांनी आपल्यावर दाखविलेला विश्र्वास नक्कीच सार्थकी लाऊन,आपण या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच दीपक नाईक, उपसरपंच वैभव सोपटे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
