गोळवण येथे विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

मालवण तालुक्यातील गोळवण येथील सौ. जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोळवण येथील सौ. जयश्री खरात ही विवाहिता तिचा पती बाळकृष्ण खरात याच्यासमवेत राहत होत्या. आज मंगळवारी सकाळी पती बाळकृष्ण हा कामानिमित्त मालवणला गेला होता . तो दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घरी परतला असता घराचे दार बंद असल्याचे दिसून आले. दार उघडून तो आत गेला असता पत्नी जयश्री हिचा मृतदेह घरातील हॉल मध्ये साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडून आला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात खबर देण्यात आली असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस श्री. मुंडे हे अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page