नूतन वेतन पथक अधीक्षक यांचे तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केले स्वागत

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका शिक्षकेतर संघटनेने नूतन शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून शिक्षणाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे नूतन शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी पदभार स्वीकारला असून *मालवण तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन शिक्षण अधिकारी यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेऊन तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित असलेल्या प्रस्तावाबाबत तसेच विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून लवकरच सर्व प्रलंबित कामाचा निपटारा करण्यात येईल असे आश्वासन शिक्षणा अधिकाऱ्यांनी दिले यावेळी तालुका संघटनेचे अध्यक्ष शर्मिला गावकर सचिव रुपेश खोबरेकर, जिल्हा उपाध्यक्ष धनश्री गावडे, जिल्हा सहसचिव प्रदीप सावंत, कैलास घाडीगावकर,शशिकांत परब, अजित गावडे, महेश गावडे,त्रिंबक्कर, अनिरिद्ध आचरेकर, सावंत मॅडम, रेश्मा ढवण, परब मॅडम, मेस्त्री मॅडम आदी पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page