शिवसेना आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत दिपाली नरेश वाडेकर पैठणीच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेत ३० महिलांनी सहभाग घेतला. द्वितीय क्रमांक पल्लवी प्रसाद अंधारी, तृतीय क्रमांक दुर्वा विनायक कडगांवकर यांनी पटकाविला. शिवसेना महिला तालुकाप्रमुख सुकन्या नरसुले यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी नगरसेवक अस्मिता राऊळ, महिला शहरप्रमुख मंजुषा आरोलकर, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, डेलिन डिसोजा, सुहास मेस्त्री, संदिप केळजी, सुरेश भोसले, गजू गोलतकर, दिलीप राणे, हेमंत मलबारी, राहूल नरसाळे, सचिन वालावलकर आदी उपस्थित होत. सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.
