व्यापाऱ्यांनी बंद धुडकावला

महाविकास आघाडीचा भाजप विरोधाचा झाला फ्लॉप शो;शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची टीका

*सावंतवाडी :* महाविकास आघाडीच्यावतीने आज सावंतवाडीत बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला सावंतवाडीतील‌ व्यापाऱ्यांनी धुडकावून लावत प्रतिसाद दिला नाही. दुकान उघडीच ठेवत व्यापाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या आवाहनाला धुडकावले आहे, त्यामुळे सावंतवाडीत तिघाडी सरकारचा फ्लॉप शो पहायला मिळाला आहे. महाविकास आघाडी सरकारचे पदाधिकारी व्यापारी नसल्यानं त्यांना व्यापाऱ्यांच्या व्यथा माहित नाही. शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीच दुकान चालू असल्याचे चित्र पहायला मिळाल आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राजकारण करण्याचा हा महाविकास आघाडीचा डाव होता. मात्र, जनतेनच या तिघाडी सरकारला जागा दाखवली असा जोरदार हल्लाबोल भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केला.

You cannot copy content of this page