तिन्ही पक्षांच्या तालुका प्रमुखासह काँग्रेस जिल्हाध्यक्षाना पोलिसांनी घेतले ताब्यात
*⚡सावंतवाडी ता.११-:* लखीमपूर येथे घडलेल्या घटनेचा आज सावंतवाडी तालुक्यात महा विकास आघाडी सरकारच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून तिन्ही पक्षांच्या तालुका प्रमुख शिवसेनेचे रुपेश राऊळ, राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी, काँग्रेस चे महेंद्र सांगेलकर तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
