समुद्र किनारे आणि समुद्रातील जैव विविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य- डॉ. सुजीतकुमार डोंगरे

*⚡मालवण ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अमाप जैव विविधता आहे, या जैव विविधतेचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. आपले समुद्र किनारे आणि समुद्रातील जैव विविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सागरी पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सुजित कुमार डोंगरे यांनी मालवण येथे बोलताना केले मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन सप्ताहाचा सांगता समारंभ ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या संयुक्त पद्धतीने पार पडला त्यावेळी डॉ. डोंगरे हे बोलत होते यावेळी कृ सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर , प्राचार्या उज्वला सामंत, संस्था सचिव गणेश कुशे, सदस्य डॉ. शशिकांत झाट्ये हे उपस्थित होते यावेळी कॉलेजचे प्रा. एच. एम. चौगले यांना शांतता प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धाचे निकाल जाहीर करण्यात आले. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा- प्रथम -प्रणिता प्रभुराम गोसावी (स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), द्वितीय – सोनाली भिकाजी कदम (संत राहुल महाराज महाविद्यालय कुडाळ), तृतीय – पूर्वा हरिश्चंद्र वेंगुर्लेकर (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण). रांगोळी स्पर्धा- प्रथम- नंदा पांडुरंग भांडे, द्वितीय- गायत्री संजू बिडये, तृतीय- सिद्धीका विलास भोगले. तर ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी ३२९ स्पर्धकांपैकी १८९ स्पर्धकांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी एच चौगुले आणि प्रा. सुमेधा नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page