नेरूर वाघचौडी येथे उद्या ‘चांडाळ चौकडी’ नाटक

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२०-:* कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघचौडी येथील ॐकार मित्र मंडळाच्यावतीने मंगळवार दि २२ डिसेबर रोजी कोरोना यौद्ध सत्कार कार्यक्रम एमआयडीसी मधील बँ नाथ पै सेवांगण प्रशाळेच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मंडळ कार्यकर्ते ‘चांडाळ चौकडी’ हे दोन अंकी नाटक सादर करणार आहेत. नेरूर वाघचौडी येथील स्थानिक कलाकारानी हे नाटक बसविले आहे. मालवणी भाषेतील हे धम्माल विनोदी नाटक आहे. शुभारंभाचा हा प्रयोग असून नाटकाचे लेखन भास्कर गावडे, दिग्दर्शन देवेंद्र गावडे यानी केले असून नेपथ्यसाथ विलास मेस्त्री यांची लाभली आहे. रात्री ८ वाजता कोरोना यौद्धा सत्कार तर ९ वाजता ‘चांडाळ चौकडी’ हे नाटक होणार आहे. अधिक माहितीसाठी विनय गावडे, सुमन गावडे, विश्वनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page