सावंतवाडी वासीयांची सिनेमाची प्रतीक्षा संपली
उद्या होणार संध्याकाळी ०४ वा. होणार उद्घाटन
*💫सावंतवाडी दि१९-:* सावंतवाडी तालुक्यातील चित्रपट शौकिनाना आता गोवा, कणकवली ची वारी करण्याची गरज पडणार नसून सावंतवाडी शहरातील कोलगाव निरूखेवाडी परीसरात येथे नवीन निर्माण झालेले आलिशान असे “आर्या नोवा मल्टिप्लेक्स” ग्राहकांचा सेवेत उद्यापासून येतं आहे. उद्या संध्याकाळी ठीक ४ वाजता या नवीन मल्टिप्लेक्स चे उद्घाटन होणार असून, या उद्घाटनाचा पार्श्वभूमीवर रसिक प्रेक्षकांना तानाजी आणि हिरकणी हे दोन चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यांनंतर सोमवार पासून या मल्टिप्लेक्स मध्ये नियमित चित्रपट दाखवण्यात येणार असून याचे दर देखील एकदम माफक असे १३० रूपये असणार आहे. याबाबतची माहिती मल्टिप्लेक्स चे संचालक प्रकाश गोठोस्कर यांनी दिली आहे. उद्या संध्याकाळी बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारी प्रदीप जोशी यांच्या हस्ते या मल्टिप्लेक्स चे उद्घाटन होणार आहे. यावेळी उद्योजक शैलेश पई , ब्राम्हण मंडळाचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर, आदी उपस्थित राहणार आहेत. या मल्टिप्लेक्स च्या आवारात बाजार भावातच चहा समोसा ,आईसक्रीम आदी खाण्याचे पदार्थ मिळणारं आहेत. तसेच बुक माय शो या अँपच्या माध्यमातून देखील आपण आपला शो ऑनलाईन पद्धतीने बुकींग करु शकतो. अशी माहिती देखील गोठोस्कर यानी दिली आहे. सोमवारपासून रोज सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ६ वाजता, आणि रात्री ९ वाजता असे चार शो दिवसाला दाखवण्यात येणारं आहेत. तरी या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोठोस्कर कुटुंबियांनी केले आहे.
