मांगवलीत ३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

ग्रामपंचायसह अन्य संस्थांचा पुढाकार

वैभववाडी प्रतिनिधी प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनी, मांगवली ग्रामपंचायत व लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत मांगवली येथे मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण विद्या प्रसारक मंडळ मुंबई संचलित मधुकर सिताराम भुर्के विद्यालय मागवली या ठिकाणी शिबीर होणार आहे. या शिबिरात बी.के.एल. वालावलकर रुग्णालय डेरवण येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, अल्सर, थायरॉईड, मुळव्याध, मूतखडे, प्रॉस्टेट ग्रंथी, मोतीबिंदू, चरबीच्या गाठी, टॉन्सिल्स, ईसीजी रिपोर्ट, पित्ताशयातील खडे, हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब तपासणी, कान-नाक-घसा, गर्भाशयाचे आजार, त्वचा रोग तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या इत्यादी आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. तरी गरजूंनी श्री महेश संसारे 7744057731, राजेंद्र राणे 7773937070, प्रविण पेडणेकर 8275524616 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रवण फार्मर चे संचालक प्रमोद रावराणे यांनी केले आहे. कोळपे विभागात प्रथमच होत असलेल्या मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा.

You cannot copy content of this page