…तर तिलारी पुलावर करणार भीक मांगो

मायकल लोबो यांचा इशारा;दोडामार्ग-विजघर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दिला इशारा

*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग ते विजघर हा संपूर्ण राज्यमार्ग पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न यावेळी वाहनधारकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो.या मार्गावरून वाहने हाकताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागतात. रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा यासाठी अनेक वेळा आंदोलने उपोषणे करण्यात आली मात्र त्या आंदोलनाला व उपोषणाला त्या संबंधीत विभागाकडून फक्त आश्वासने दिली आहे. काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. एक महीना पुर्ण होता न होता त्या रस्त्यावरील बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याने संपूर्ण रस्ता हा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत दोडामार्ग ते विजघर मुख्य राज्यमार्गावरी खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास तिलारी पुलावर भिकमांगो आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page