*⚡कणकवली ता.२८-:* युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल महाविद्यालयाचा डॉ . बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा द्वितीय वर्ष सत्र -४ बी.फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला आहे . या परीक्षेमध्ये युक्ता कुलकर्णी ( ९ .७ ९ SGPA ) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे , तसेच प्रमदा नाईक ( ९ .६४ SGPA ) व प्रांजल घाडीगावकर ( ९ .५० SGPA ) गुण मिळवून यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे . तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आम.वैभव नाईक , उपाध्यक्षा . सौ.स्नेहा नाईक , सचिव डॉ.रमण बाणे , खजिनदार मंदार सावंत , प्राचार्य पुजा पटेल , बी.फार्मसी विभाग प्रमुख प्रा .अमर कुलकर्णी व डी .फार्मसी विभाग प्रमुख प्रा.चंद्रशेखर बाबर , प्रा. मेघा बाणे , प्रा. ऋषीकेश काटकर , प्रा .श्वेता पाटील , प्रा. निशा करंदीकर , प्रा. नमिता सागवेकर , प्रा. प्रणिता चव्हाण व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले .
शिरवल येथील विजयराव नाईक बी.फार्मसी महाविद्यालयाचा १०० % निकाल
