सिंधुदुर्गात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पाठबळ द्यावे

राजेंद्र पेडणेकर यांनी नाम.सतेज पाटील यांचे वेधले लक्ष

*⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात याही पुढे प्रत्येक महिन्यात जिल्हा संपर्क सतत ठेवुन राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पाठबळ द्यावे अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सतेज पाटील यांच्याकडे कणकवली येथील काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर तसेच कोल्हापूर येथील किसनराव फडतरे यांनी कोल्हापूला गोकुळ दुधसंघामध्ये नाम.सतेज पाटील यांची भेट घेऊन सिंधुदुर्गात येण्याची विनंती केली होती, त्याला मान देऊन 27 सप्टेंबर रोजी नाम.सतेज पाटील कणकवली येथे आले होते.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे उपस्थित होते. सिंधुदूर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सतेज पाटील 27 रोजी रात्री ८ वाजता कणकवलीमध्ये कणकवली तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या श्री गणेश दर्शन घेतले.त्यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर व काँग्रेस तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर यांनी नाम. सतेज पाटील यांचा सत्कार केला.

You cannot copy content of this page