*⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघ , कणकवली व सावंतवाडी जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग,जेष्ट नागरिक राष्ट्रीय हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जेष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर 2021रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल,मेनरोड सावंतवाडी येथे सकाळी 10 ते 2 यावेळेत साजरा करणेत येणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून जेष्ठ नागरिक राष्ट्रीय हेल्पलाईन लोकार्पण सोहळा आणि मार्गदर्शन होणार आहे,सर्व जेष्ठ नागरिक तालुका प्रमुख यांचे स्वागत जेष्ठ सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे.तरी सर्व तालुका अध्यक्ष,सचिव यांनी त्यांचे कार्यकारिणी अन त्यांचे अधिनस्थ उप शाखा प्रमुख,सभासद अन जनतेसह आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघ जिल्हाध्यक्ष सी. द. उर्फ दादा कुडतरकर ,जिल्हा सचिव रवींद्र मुसळे यांनी केले आहे.
सावंतवाडी येथे 1 ऑक्टोबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन कार्यक्रम
