स्वच्छ कामकाजामुळेच आजपर्यंत बँकेवर आरोप करता आले नाहीत:सतीश सावंत

जिल्हा बँकेची आज वार्षिक सभा:१ हजार १७७ प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

*⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक येत्या काळात देशात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असून स्वच्छ कामकाजामुळेच आजपर्यंत बँकेवर आरोप करता आले नाही. जिल्हा बँकेची २९ सप्टेंबर रोजी ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ओरोस येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला भागधारक १ हजार १७७ संस्था प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. यावेळी जिल्हा बँक संचालक आर. टी. मर्गज ,प्रमोद गावडे उपस्थित होते. सतीश सावंत पुढे म्हणाले की, २०२०-२१ वर्षाच्या ऑडिट अहवालामध्ये ‘अ’ वर्ग मिळाला नाबार्डमध्येही सातत्याने ‘अ’ वर्ग मिळाला. प्रशासन आणि संचालक यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली असून सहकारी संस्था सहकार्य मिळाले. महाराष्ट्रात जिल्हा बँक अग्रेसर असून सातारा, अकोला संचालकांनी कामाची पाहणी केली. तसेच अधिकाराचे विकेंद्रीकरण केले त्याचा गौरव केला. सहकारात बँकेने बँकिंग सेवांचे विणलेले जाळे याबाबत समाधान व्यक्त केले. वैधानिक लेखापरीक्षण झाले. २२,००९२ ठेवीपर्यंत वाटचाल केली असून स्वनिधी वाढला. तसेच बँकेचा सीडी रेशो ६७.९२ झाला असून ढोबळ नफा ६५ कोटी ९२ लाख निव्वळ नफा १४ कोटी झाला. आर्थिक वर्षात अनेक उपक्रम राबवले, अत्याधुनिक डाटा सेंटर, गटसचिवांना विमा संरक्षण, सात बारा, आठ अ बँकेत द्यायला सुरुवात केली. कोविडमध्ये अनाथ बालकांना मदत, मंगलमूर्ती वाहनकर्ज योजना राबवली, तोक्ते नुकसान आणि अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना ६ टक्के दराने पतपुरवठा, तारकर्ली पर्यटन व्यवसायिकांना ९ टक्के दराने पतपुरवठा बँकेच्या माध्यमातून करण्यात आला. खावटी कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत..शेतकरी मुलांना चांगले मेरिट आहे,त्यांना बँकेने स्व निधीतून व्याज परतावा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.अभिमान वाटेल असा कारभार आम्ही केला आहे,असे सतीश सावंत यांनी सांगितले. बँकेने १५ टक्के लाभांश जाहिर केला असून भविष्यात जिल्ह्यातील सीडी रेषो वाढण्यासाठी प्रयत्न करणार असून अजून काही योजना सुरू करणार असे सतीश सावंत यांनी सांगितले. बँकेच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे. शिक्षणासाठी दिलेल्या व्याजाचा परतावा दिल्याने त्याचा फायदा होईल. देशात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अग्रगण्य राहिल. आजपर्यंत बँकेच्या कामकाजावर कुणाला आरोप करता आले नाही. तशीच कामगिरी येत्या काळात करण्याचा प्रयत्न करणार. तसेच कोविडचे नियम पळून उद्याची सभा होणार असून त्यासाठी शरद भवनचे ६ हॉल बुक केले नियोजन प्रशासनाने केले असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page