सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १२ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी तालुक्यात आज १२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालई वाडा, वैश्य वाडा, खास्कील वाडा येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात ओटवणे, न्हावेली, सावर वाड, आरोंदा येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. तर नेमळे येथे ५ रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ११६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page