*⚡मालवण ता.२५-:* ओरोस येथे होऊ घातलेले मेडिकल कॉलेज याच वर्षी सुरू होणार असून केंद्राच्या वैद्यकीय आयोगाने मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यासाठी असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडे अवधी असल्याने ती आम्ही पूर्ण करणारच. पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नामुळे शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होईलच असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी येथे बोलताना व्यक्त केला . मालवण येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार पत्रकारांशी संवाद साधताना आ. नाईक हे बोलत होते. आम नाईक म्हणाले, केंद्राच्या वैद्यकीय आयोगाने मेडिकल कॉलेज मान्यतेच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेडिकल कॉलेज मंजूर करून अवघ्या वर्षभरात यासाठी आवश्यक सर्व सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे वर्षभरात मेडिकल कॉलेज सुरू होत असल्याने काहींच्या पोटात दुखत आहे. त्रुटींची पूर्तता होण्याच्या दृष्टीने शासन यंत्रणा कार्यरत असून पालकमंत्री, खासदारांकडूनही प्रयत्न सुरू आहेत. आमची बांधिलकी जनतेशी आहे. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही नाईक म्हणाले.
पालकमंत्री सांमत आणि खासदार राऊत यांच्या प्रयत्नामुळे शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होईल-:वैभव नाईक
