देशात महाराष्ट्र राज्य पर्यटनात प्रथम क्रमांक होण्याची क्षमता ठेवते – संतोष मंडलेचा

*⚡मालवण ता.२५-:* आपल्या देशात केरळ हे राज्य पर्यटनाकरिता प्रसिद्ध असून प्रथम क्रमांकावर आहे मात्र महाराष्ट्र राज्यात पर्यटनासाठी पोषक वातावरण सोयीसुविधा आहेत कृषी पर्यटन, धार्मिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य, प्राचीन गड किल्ले असल्याने पर्यटन व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन संस्कृती सर्वांना समजावल्यास व रुजवल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक व्यवसाय जोडलेले आहेत महाराष्ट्र राज्यात पर्यटनात विकास होण्याकरता प्रचंड संधी आहेत या संधीचे सोने करणे जेवढे राज्य सरकार व पर्यटन विभागाचे कर्तव्य आहे तेवढेच कर्तव्य या क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्वांचे आहे सर्वांनी एकत्रित काम केल्यास महाराष्ट्र राज्य पर्यटनात प्रथम क्रमांक निश्‍चित मिळवू शकतो. देशात महाराष्ट्र राज्य पर्यटनात प्रथम क्रमांक होण्याची क्षमता ठेवते, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबरचे ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या पर्यटन समितीच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त भित्तीपत्रकाचे अनावरण महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यटन समितीचे चेअरमन दिलीप सिंग बेनिवाल यांनी केरळ व इतर राज्यात पर्यटनाचा व्यवसाय कसा वाढीस गेला याची माहिती दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन विकास अधिकारी नेमावा, तालुकास्तरावर काम केल्यास स्थानिक पातळीवर व्यवसाय व रोजगार मिळेल. परिसराचा विकास होईल असेही बेनिवाल म्हणाले.  यानिमित्ताने पर्यटन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कृषी समितीच्या चेअरपर्सन सौ सुनीता फाल्गुने, श्री. स्वप्नील जैन, श्री. सत्यनारायण पांडे, श्री. जगदीश चौधरी, सहाय्यक सचिव अविनाश पाठक आदिसह सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page