*💫मालवण दि.१९-:* मालवण बंदरजेटी येथे रमेश भिकाजी मांजरेकर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपी विश्वास आप्पा मेस्त (५३, रा. मेढा-मालवण) याची मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे अॅड. हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले. ९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. मेस्त याने मांजरेकर यांच्या उजव्या बरगडीच्याखाली व पोटावर चाकू मारला. मांजरेकर यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. याप्रकरणी मांजरेकर यांनी दिलेल्या पोलिसातील तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
मालवण चाकू हल्ला प्रकरणी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता
