भारत सरकारची “वाय” दर्जाची सुरक्षा आली देण्यात
*💫कणकवली दि.१९-:* राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना भारत सरकारची “वाय” दर्जाची सुरक्षा देऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सुरक्षा पथकात दोन अधिकाऱ्यांसह ११ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेत काही प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यामध्ये खासदार नारायण राणे यांचा सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. सद्या राज्यसरकारची “वाय” दर्जाची सुरक्षा असून त्याचाच आढावा केंद्र सरकारने घेतला असून भारत दर्जाच्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
