ई पीक नोंद सप्ताहचा काँग्रेसकडून मालवण येथे शुभारंभ

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकारच्या समनव्यातुन शेतकऱ्यांना पिक नोंद व शेतीची माहिती सुलभरित्या होण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई पीक नोंदणी सुरू असून शासनाच्या या उपक्रमाला हातभार लागावा या हेतूने राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने आजपासून ई- पिक नोंद सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्याचा शुभारंभ काँग्रेसचे मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी यांच्या उपस्थितीत कोळंब येथील शेतकरी श्री. आनंद प्रभू यांच्या शेत जमीनीतून इ पीक नोंदणी करून करण्यात आला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या निर्देशनानुसार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सूचनेवरून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी यांच्या उपस्थितीत आज विधानसभा कुडाळ – मालवण मधील युवक काँग्रेस पदाधिकारी यांनी देखील ई- पिक नोंदणी कामी शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी जुन्या सातबारा उताऱ्यांवर ठरावीकच पिकांची नोंद आढळते या मुख्य पिकां व्यतिरिक्त कमी क्षेत्र असलेल्या शेतात इतरही पीकं घेतली जातात. ज्यात सुपारी, कोकम, मिरी प्रमाणे इतर मसालेदार पदार्थ, चिबुड, काकडी, पडवळ, भोपळा, कारर्ली अन्य भाजी पाला यांच्या नोंदी देखील भविष्यात करण्यात येऊ शकणार आहे यामुळे लहान शेतातील सगळ्या पिकांची नोंद शेतकरी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून सातबारा उताऱ्यावर नोंदवू शकणार आहेत यामुळे एखाद्या गावात नेमकं किती क्षेत्र पिकाखाली आहे, त्यात कोणतं पिक घेतलं जातं ते किती प्रमाणात येत त्यावर अजून काय प्रक्रिया करावी लागेल या बाबींचा अंदाज शासना प्रमाणे शेतकऱ्यांना देखील घेता येईल व त्यांना याची माहिती कळणार असल्याचे सांगून श्री मोंडकर यांनी पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे ती वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने मोबाईल मधून प्ले – स्टोअर वर जाऊन अॅप डाऊनलोड करून ई पिक नोंद व पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, जिल्हा युवकचे श्री देवानंद लुडबे, जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर, युवक विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी, मालवण तालुका युवक अध्यक्ष अमृत राऊळ, शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, ममता तळगावकर, योगेश्वर कुर्ले व इतर पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page