*⚡बांदा दि.२३-:* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्यांवर चर्चा करून दिलेल्या ठोस आश्वासनाची कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कार्यालयाचे फसवे व वेळकाढू धोरणामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांत तिव्र संताप निर्माण झाला असून न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी उद्या 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ, सिंधुदुर्गचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांनी सांगितले. देशात व राज्यात कोव्हिड-19 या आजाराचे महाभयंकर संकट असूनही शासन नियम व मार्गदर्शक सुचनांचे पालन करून तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन संघटनेने केले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापक कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे फसव्या व वेळकाढू धोरणामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांत संताप आहे. आमच्यावर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध आम्ही सनदशिर मार्गाने आमच्या न्याय मागण्यांसाठी कोरोना नियमांचे पालन करून धरणे आंदोलन छेडणार असल्याचा लेखी इशारा श्री.पावसकर यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतर कमचाऱ्यांचे उद्या धरणे आंदोलन
