फोंडाघाट गांगोवाडी येथे ई पिक पाहणी मार्गदर्शन

तहसीलदार रमेश पवार ,माजी कृषी सभापती संदेश पटेल यांची उपस्थिती

*⚡कणकवली ता.२२-:* फोंडाघाट गांगोवाडी येथे ई पिक पाहणी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार रमेश पवार ,जि. प.माजी कृषी सभापती संदेश पटेल, तलाठी जयनवार, महसूल कर्मचारी बाजीराव काशीद,कृषी सहायक अक्षया परब, माजी सरपंच भाई भालेकर, राजन नानचे, मोहन पाताडे, विलास लाड, जया जाधव, ध्रुव गोसावी ,भाई सावंत ,हर्षद सावंत, शुभम सावंत, मिलींद लाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीथ होते. तहसीलदार रमेश पवार यानी उपस्थित ग्रामस्थांना ई पिक नोंदीचे फायदे व तोटे याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच बाजीराव काशीद यानी ई पिक ॲप कसा डाउन लोड करायचा व त्यात कशा प्रकारे माहिती उपलोड करायची यासंदर्भात माहिती देऊन ग्रामस्थांकडून ॲप डाउनलोड करुन घेतला.तसेच लगतच्या शेतामधे जाऊन तहसीलदार रमेश पवार यानी पिक नोंदणी कशा प्रकारे करावी याचे पिक नोंदणी करुन प्रात्यक्षित दिले.यावेळी गांगोवाडी ई पिक पहाणी असा वॉटस अप ग्रुप करण्यात आला. सदर ग्रुप मधे ग्रामस्थांबरोबर मंडल अधिकारी, तलाठी तसेच बाजीराव काशिद यांचाही समावेश करण्यात आला.यावेळी संदेश पटेल यानीही ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जोइल यानी तसेच आभार संजय सावंत यानी मानले.महसूल अधिकारी वाडी वाडीवर जाऊन लोकांना ई पिक पहाणी संदर्भात मार्गदर्शन देत आहेत यासाठी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page