भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदन देत दिला इशारा
*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी आगारातून चालक, वाहक व कर्मचारी असे २० जण मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समजताच शहर भाजपच्या वतीने आज सावंतवाडी आगर प्रमुख वैभव पडोळे यांची भेट घेत कर्मचाऱ्यांना मुंबई येथे पाठवू नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे. गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगार मधून कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेसाठी मुंबई येथे पाठवण्यात येत आहे. परंतु परिवहन मंडळाकडून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात नसल्यानेच कुडाळ तालुक्यातील बेस्टच्या सेवेत गेलेले २० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाले होते. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातून बेस्टच्या सेवेसाठी कर्मचारी पाठवू नये असा इशारा आज भाजपच्या पदाधिकाऱ्यंनी दिला आहे. आज भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी भाजपच्या वतीने सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडोळे यांची भेट घेऊन कर्मचारी मुंबईला पाठवू नये याबाबत निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहरध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक सुधिर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवीका समृद्धी विरनोडकर, नगरसेविका दीपाली भालेकर, नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, युवक शहरध्यक्ष संदेश टेंबकर, विनोद सावंत, दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.
