त्या कर्मचाऱ्यांचे उद्या पुन्हा ठिय्या आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता २१ कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून शासनाने कोव्हीड योध्याना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जि.प.समोर ठीय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडुन कोव्हीड सेंटर उभारण्यात आली. सदर कोव्हीड सेंटर कार्यरत ठेवण्यासाठी सर्व कर्मचा-यांना कोव्हीड योध्या म्हणून नियुक्ती देण्यात आलेली होती. या कालावधीत कोरोना योध्दा म्हणुन कोरोनाची भिती न बाळगता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७२ कर्मचा-यांनी अविरतपणे काम केले आहे. यामध्ये स्टाफ नर्स, सर्व्हट, डाटा इंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, फार्माशिस्ट अशा विविध पदांवर सर्वजण कार्यरत होते. परंतु कोरोना काळात काम करुन देखील कोणतीही पूर्व सुचना न देता ३१ ऑगस्ट २०२१ पासुन शासनाकडून सेवा समाप्त केल्याचे आदेश दिलेले आहेत.त्यामुळे अचानक कामावरून कमी केल्याने या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात काम केल्याने कायमस्वरूपी सेवेत समाउन घ्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. या मागणीसाठी २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जिल्हा परिषद समोर ठीय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आरोग्य कर्मचारी यांनी जाहिर केले आहे यामध्ये अमित वजराटकर ,प्राजक्ता माळवदे,सुमेंधा गावकर ,रेश्मा नायर हार्दिक कदम, यांच्यासह मोठ्या संखेने आरोग्य कर्मचारी(कोरोना योद्धा) सहभागी होणार आहेत.

You cannot copy content of this page