सुहास माळकर यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर

*⚡मालवण ता.२०-:* आर्टस् बिट्स फाउंडेशन, पुणे या संस्थेतर्फे दिला जाणारा कला सन्मान पुरस्कार मालवण कोळंब मधील दशावतारी व भजनी कलावंत सुहास उर्फ मामा मोहन माळकर यांना जाहीर झाला आहे. माळकर हे बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळाचे मालक आहेत. सुहास माळकर हे गेली २५ वर्षे दशावतार नाटक व भजनी कला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग केले आहेत. दशावतारी नाटकात ते लक्षवेधी भूमिका करतात. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page