कळणे खाण येथे केली पाण्याची सोय

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे कळणेवासियानी मानले आभार

*⚡दोडामार्ग ता.२० सुमीत दळवी-:* कळणे खाण येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर तेथील पिण्याचे पाणी दूषित झाले होते. त्यावेळी प्रशासनाकडून तेथील पाणी शुद्ध होत नाही. तोपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे सांगितले होते. परंतु, खाण कंपनीने सदर पाणी वितरकाचे बिल अदा न केल्याने तेथील पाणी पुरवठा अचानक बंद केल्याने तेथील नागरिकांची गेले ९ – १० दिवस गैरसोय होत आहे. ही बाब मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा लक्षात येताच त्यांनी तातडीने त्या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय केली असून, कळणे वासियानी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत. याबाबतची माहिती मनसे पदाधिकारी अभय देसाई यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page